(आरोपीस 6 दिवसाची पोलीस कोठडी मंजुर)
जालना शहरातील जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअर हाऊस च्या नावे 177 बनावट खातेदारांच्या माध्यमातुन 23 कोटी 33 लाख रुपयांची फसवणूक केल्या बाबत तक्रार प्राप्त झाल्यावरुन चंदनझीरा पोलीस स्टेशन येथे नमूद प्रकरणात चंदनझीरा गु.र.नं. 220/2026 कलम 316(2), 318(4), 336(3), 338, 340(2), 61(2),3(5) BNS 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर बँकेमध्ये अपहार झाल्याने व सदर अपहाराची रक्कम मोठ्या प्रमाणात असल्याने गुन्ह्याची व्याप्ती बघून माननीय पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बंसल व श्री अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सदर गुन्ह्याबाबत सखोल तपास करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिलेले आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आरोपी नामे 1) रायचंद सखाराम कुरंगळ 2) निलेश्वर शेषराव भोसले वय 46 वर्ष सिंदखेड राजा जि. बुलढाणा हे दोन्ही आरोपी सुरवातील अटक केलेली असुन त्यांना दिनांक 24/04/2026 रोजी पावेतो पी.सी.आर. दिलेला आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्या अनुषंगाने संशयित तसेच साक्षीदार यांचेकडे केलेल्या चौकशीमध्ये अटकेतील आरोपींकडे तसेच साक्षीदारांकडे केलेल्या चौकशी दरम्यान व त्यांनी सादर केलेल्या पुराव्यावरून गुन्ह्यांमध्ये काही इसमांनी बनावट कागदपत्रे सादर करण्यासाठी लायसन्स काढने, मार्केट कमीटी पावती तयार करणे, यासारखी कामे व खातेदारांना त्या बदल्यात दहा ते विस हजार रुपये देण्याचे आमीष दाखवुन त्यासाठी एजंट म्हणून काम केलेले असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने त्यांचा शोध सुरू केला असता ते फरार झाल्याचे समजल्याने त्यांचा तांत्रीक विश्लेषणावरुन तपास करुन आरोपीतांचा शोध घेऊन आरोपी नामे 1) रामेश्वर विलासराव जाधव 2) ज्ञानेश्वर विलासराव जाधव यांना बुलढाणा जिल्ह्यातुन अटक करण्यात आली व आरोपी नामे 3) सुधाकर रावसाहेब ठोंबरे यास जालना येथुन दिनांक 19/04/2026 रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 दिवसांचा पी.सी.आर. मिळाला आहे. आरोपीतांकडे चौकशी चालु असुन इतर आरोपीतांची नावे निश्पन्न करुन त्यांचा शोध सुरू आहे.
सदर कामगीरी ही मा. श्री. अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना, श्री. आयुष नोपाणी अपर पोलीस अधीक्षक जालना, श्री.सुरेश उनवणे प्रभारी पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा जालना, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिथुन घुगे सहा. पोलीस निरीक्षक,शैलेश म्हस्के, पोलीस उप निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा जालना, आणि शाखेतील पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजू भोसले, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार, जयश्री निकम, मंदा नाटकर यांनी पार पाडली







